नववर्षात घर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्यासांठी आनंदाची बातमी आहे. गेल्याच वर्षी स्टेट बॅंक ऑफ इंडिय़ाने गृह कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता इतर ही बॅंका तसेच हाऊसिंग कंपन्या व्याजदरात कपात करण्याची तयारी दर्शवत आहते. बॅंकासोबतच अऩेक फायनान्स कंपन्याही मोठया प्रमाणात हाऊसिंग लोन देतात. त्यांनीही आता गृह कर्जावरील व्याजदर पाव टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकींग क्षेत्रातील स्पर्धेमुळे गृह कर्जावरील व्याज कपात करणे खासगी कंपन्यांना जरुरीचे आहे.
या बॅंकांच्या व्याजदरात कपात
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एचडीएफसी, पीएनबी हाउसिंग फायनान्स आणि इंडियाबुल्स हाउसिंगही व्याजदरात कपात करण्याचा विचार करीत आहेत. तर एलआयसी हाऊसिंग फायनान्सने या आधीच व्याजदरात पाव टक्क्यांची कपात केल्याचे जाहिर केले आहे. त्याचबरोबर एलआयसी हाउसिंग फायनान्सतर्फे ज्या अर्जांमध्ये महिलेचे नाव असेल त्या अर्जांना कमी दर आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या कंपनीच्या अॅसेट लायबिलिटी समितीच्या बैठकीत व्याजदर कमी करण्याबाबत विचार होण्याची शक्यता आहे.
गृह कर्जात 10 टक्क्यांनी वाढ
दरम्यान अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा भाग असलेल्या रियल इस्टेटला देखील मंदीचा फटका बसला होता. मात्र या वर्षीच्या तिमाहीत खरेदी विक्रिला प्रोत्साहन देण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांमुळे वितरित कर्जाची वसुली चांगली होण्याची शक्यता आहे. गृह कर्जामध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली असून, बॅंकांमधुन घेण्यात येणाऱ्या गृह कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत एकूण वितरित गृहकर्ज 19.5 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. एकूण वितरित गृहकर्जांमध्ये हाउसिंग फायनान्स कंपन्या आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा (नॉन बँकिंग फायनान्स कंपनी) वाटा 36 टक्के होता. हा हिस्सा गेल्या वर्षी 38 टक्के होता. त्या तुलनेत बँकांनी वितरित केलेल्या गृहकर्जाचा हिस्सा 62 टक्क्यांवरून 64 टक्क्यांवर गेला आहे.