भारत देश लोकसंख्येत जगात दुसऱ्या स्थानी आहे. 2019 साली भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहचली आहे. भारतात 2020 या नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात झाले असून नववर्षाच्या सुरूवातीलाच भारतात जन्म घेतलेल्या बालकांची संख्या समोर आली आहे. तब्बल 67 हजार 385 बालकांनी 1 जानेवारी 2020 दिवशी भारतात जन्म घेतला आहे.
दरम्यान, सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन मात्र, 1 जानेवारीला जन्म घेतलेल्या बालकांच्या संख्येत दुसऱ्या स्थानी आहे. चीनमध्ये 46 हजार 229 बालकांनी जन्म घेतला आहे. तर नायजेरियात 26 हजार 39 बालकांनी, पाकिस्तानात 13 हजार 20 बालकांनी, इंडोनेशियात 13 हजार 20 बालकांनी आणि अमेरिकेत या दिवशी 10 हजार 452 बालकांनी जन्म घेतला आहे. सदर आकडेवारी युनीसेफने प्रसिद्ध केली आहे. वरिल आकडेवरीचा विचारकरता इतरांच्या तुलनेने भारतात या दिवशी जन्म घेतलेल्या बालकांची संख्या 17 टक्के इतकी आहे.
त्याचबरोबर 1 जानेवारी 2020 ला पहिल्या बालकांची नोंद फिजी या देशात झाली तर शेवटच्या बालकाची नोंद अमेरिकेत करण्यात आली.