भारतामध्ये, भविष्य, पंचांग, राशी, ग्रह-तारे यांना अनन्य साधारण महत्व आहे. आपण 21 व्या शतकात जगत असलो तरी सुद्धा हस्त रेषांवरील भविष्य मानणारे अनेक लोक आहेत. लग्न जुळवण्यासाठी वर आणि वधुची पत्रिका जुळणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. गृह प्रवेश, लग्नाचे शुभ- अशुभ मुहुर्त, पुजा विधी हे सगळ करणार खुम मोठा वर्ग भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात आहे. त्यातल्या त्यात राशीचक्र अत्यंत महत्वाचे मानले जाते. तेंव्हा तुमच नाव आणि जन्माक्षर या पासून तुम्हाला मिळणारी राशी आणि त्यानुसार यंदाच 2020 हे संपुर्ण वर्ष कोणत्या राशीसाठी कसे असेल चला तर जाणून घेऊयात.
मेष
मेष राशि भविष्य २०२० च्या अनुसार, मेष राशीतील व्यक्तींना या वर्षाच्या उत्तरार्धात स्वास्थ्य लाभ मिळेल. वर्षाच्या सुरवातीत स्थिती चढ उताराने भरलेली राहील म्हणून तब्बेतीची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रेम जीवनात कठीण प्रसंग येऊ शकतात. वैवाहिक जीवन हे आनंदी राहील आणि कुठलीही मोठी समस्या येणार नाही. मेष राशि भविष्य २०२० मध्ये तुमची मुले बरीच प्रगती करतील. हे वर्ष करिअरला उच्चता देणारे आहे म्हणून या वर्षाचे स्वागत करा आणि प्रत्येक संधीला आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
वृषभ
वृषभ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या राशीतील व्यक्तींचे स्वास्थ्य चढ उताराचे राहील. तुम्हाला काम आणि आराम यामध्ये संतुलन ठेवण्याची आवश्यकता असेल कारण, तुम्हाला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेम जीवनासाठी वर्ष अनुकूल राहील आणि तुमचे प्रेम जीवन उत्तम होईल. विवाहित व्यक्तींसाठी ह्या वर्षाची सुरवात अधिक चांगली नाही. वर्षाच्या पूर्वार्ध कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल नाही आणि आई वडिलांचे आरोग्य ही प्रभावित राहील, परंतु उत्तरार्धात सप्टेंबर नंतर स्थिती बऱ्या पैकी अनुकूल होईल. विद्यार्थ्यांसाठी वर्ष अनुकूल असेल.
मिथुन
मिथुन राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या राशीतील व्यक्तींच्या वर्षाची सुरवात आरोग्य संबंधित अनुकूल राहील. प्रेम संबंधासाठी हे वर्ष बरेचशे चांगले राहील, विवाहित लोकांना आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि सासरच्या पक्षाशी चांगले संबंध ठेवावे लागतील. मिथुन राशी असलेले शिक्षणात तसेच काही क्रिएटिव्ह क्षेत्रात आवड निर्माण करतील. कुटुंबातील लोक अध्यात्मिक गोष्टीत अधिक लक्ष देतील. वर्षाची सुरवात करिअर साठी काही आव्हानात्मक राहू शकते तसेच यावर्षी तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्यापासून सावध राहिले पाहिजे.
कर्क
कर्क राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आपल्या तब्बेतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि संतुलित दिनचर्येचे पालन केले पाहिजे. प्रेम जीवनात काही दीर्घकालीन बदल होऊ शकतात, कौटुंबिक जीवनात अडथळे येऊ शकतात. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी कठीण मेहनत करण्याचे संकेत देत आहे. या वर्षात खर्चात वृद्धी होईल, तथापि आपल्या बचतीवर लक्ष द्या. वर्षाची सुरवात करिअरसाठी सामान्य रूपात शुभ राहील.
सिंह
सिंह राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्हाला आरोग्याची प्राप्ती होईल आणि उत्तम स्वास्थ्याचा तुम्ही आनंद घ्याल. वेळेनुसार ध्यान आणि योग करत राहा. प्रेम जीवनात बदल येऊ शकतात आणि काही नाते संपण्याच्या मार्गावर ही येऊ शकतात. जर तुम्ही विवाहित आहेत तर दांपत्य जीवनात तणाव राहू शकतो. या वर्षातील अंतिम महिन्याचे दिवस दांपत्य जीवनासाठी चांगले राहतील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बरेच यश देणारे असेल आणि स्पर्धा परीक्षेत ही यश मिळाल्याने तुमचे मनोबल वाढलेले असेल. करिअरच्या दृष्टिकोनाने हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील
कन्या
कन्या राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुम्ही स्वास्थ्य बाबतीत बरेच भाग्यशाली असाल. या वर्षी कन्या राशीवाल्यांचे प्रेम आयुष्य उत्तम असेल, तसेच जर तुम्ही विवाहित आहेत तर वैवाहिक लोकांसाठी हे वर्ष संधींनी भरलेला राहू शकते. कन्या राशीतील विद्यार्थ्यांना या वर्षी काही मोठी संधी प्राप्त होऊ शकते तर करिअरच्या दृष्टिकोनाने वर्ष प्रगतिशील सिद्ध होईल.
तुळ
तुळ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुमचे स्वास्थ कमजोर राहण्याची शक्यता आहे. तुळ राशि भविष्य २०२० मध्ये तुमच्या प्रेम जीवनात रोमान्स आणि आकर्षणात वृद्धी होईल. जर तुम्ही विवाहित आहेत तर, दांपत्य जीवनासाठी वर्षाची सुरवात काही नाजूक राहील. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले राहू शकते आणि नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना बऱ्याच मेहनतीनंतर नोकरी मिळू शकते. या वर्षी तुम्ही कुठला ही नवीन व्यवसाय करू नका.
वृश्चिक
वृश्चिक राशि भविष्य २०२० च्या अनुसार, हे वर्ष तुम्हाला चांगल्या आरोग्याकडे घेऊन जाईल. प्रेम जीवनात या वर्षी बराच आराम मिळेल आणि जे लोक सिंगल आहे त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकतो. दाम्पत्य जीवनासाठी वर्ष अधिक उत्तम असेल विद्यार्थ्यांना कठीण संघर्षा नंतर यशाची प्राप्ती होईल. वर्षाच्या सुरवातीत कुठले नवीन कार्य सुरु करू शकतात आणि या वर्षी जसे जसे वर्ष पुढे जाईल तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त होतील.
धनु
धनु राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी तुमचे स्वास्थ्य चांगले राहू शकते. दांपत्य जीवन बरेच मधुर राहील, तुम्ही वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल. शिक्षणाच्या क्षेत्रात मिश्रित परिणामांची प्राप्ती होईल. हे वर्ष चांगल्या गोष्टी होण्याचे संकेत देते.
मकर
मकर राशि भविष्य २०२० च्या अनुसार, हे वर्ष तुमच्यासाठी बऱ्याच अंशी चांगले राहील. प्रेम जीवनासाठी वर्ष बरेच अनुकूल तर दांपत्य जीवनात चढ उताराची स्थिती राहू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला कठीण परिश्रम करावे लागेल तसेच आर्थिक दृष्टीकोनाने हे वर्ष थोडे कमजोर राहू शकते. मात्र बेरोजगार लोकांना एक स्थायी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशि भविष्य २०२० च्या अनुसार, या वर्षी काही समस्यांचा सामना करावा लागेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जोडप्यांची स्थिती यंदा मिश्र स्वरुपाची असेल, अनेक चढ उतार होणार यंदाच वर्ष असेल. कमाई वाढण्या-सोबत खर्चात वर्षी होईल. या वर्षी तुम्हाला अध्यात्माने जोडलेले अनेक चांगले अनुभव मिळतील.
मीन
मीन राशीच्या जातकांसाठी हे राशि भविष्य 2020 शुभ आहे. या वर्षी तुम्ही नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरु करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. जमिनीच्या गोष्टींना घेऊन कुटुंबात वाद होऊ शकतो. आर्थिक स्थिती या वर्षी मजबुत असेल.