Ads
ओपन मांईड

हिवाळ्यात अंजीरच्या बागेचे व्यवस्थापन

डेस्क desk team

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण 417 हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी 312 हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकटया पूणे जिल्‍हयात आहे.

हवामानातील बदलाचा अंजीर बागेच्या वाढीवर व उत्पादनावर वाईट परिणाम होतो. थंडीमुळे बागेतील झाडांच्या पानांची व फळांची वाढ समाधानकारक होत नाही.यासाठी आज आपण अंजीरच्या बागेचे व्यवस्थापन कसे केले जाऊ शकते याची माहिती पाहू

बागेची स्वच्छता व व्यवस्थापन महत्त्वाचे :

  •  पिकांचे पोषण व पाणी व्यवस्थापन.
  • बदलत्या हवामानाप्रमाणे बहरतात बदल करणे काळाची गरज.
  • बागेच्या पश्‍चिम व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, मलबेरी, करंज, शेवगा, हलगा, पांगारा, जांभूळ इ. लागवड करावी.
  • हिवाळ्यात बागेतील झाडांत पसरणारी वाटाणा, वाल, चवळी, घेवडा, पानकोबी, फुलकोबी, पालेभाज्या आदी मिश्र पिके घ्यावीत, म्हणजे जमिनीत उष्णतामान टिकून राहण्यास मदत होते.
  • अंजीर बागेला विहिरीचे, पाटाचे पाणी घ्यावे. त्यामुळे जमिनीलगतच्या हवेचे उष्णतामान थोडे वाढते आणि
  • झाडांच्या वाढीवर थंडीचा विपरीत परिणाम होत नाही.
  • अंजीर बागेत रात्री जागोजागी शेकोटी पेटवून धूर धुमसत राहील असे पाहावे. त्यामुळे बागेत धुराचे दाट
  • आवरण तयार होईल व बागेचे तापमान वाढीस मदत होईल.
  • अंजीर बागेच्या वाफ्यांमध्ये शक्‍य असल्यास कडबा, गवत, सरमाड, पालापाचोळाचे आच्छादन करावे.
  • लहान लावलेली कलमे, रोपवाटिकेतील रोपे व कलमे यांना तुरंट्या, कडबा, पाचट अथवा पॉलिथिनचे छप्पर करावे.
  • थंडीचे प्रमाण वाढल्यास प्रति झाड 200 ते 500 ग्रॅम या प्रमाणात म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीतून घ्यावे. असे केल्यास फळ गळ थांबते.
  • पोटॅश नायट्रेट किंवा पोटॅश क्‍लोराईड त्याचे कमी तीव्रतेचे द्रावण झाडास दिल्यास झाडांचा काटकपणा वाढू शकतो.
  • तांबेरा नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण एक टक्का किंवा तीन ग्रॅम डायथेन एम 45अधिक बाविस्टीन एक ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांनी फवारावे.
  • अंजिराची निरोगी झाडे, अशक्त, रोगट किंवा कीडग्रस्त झाडापेक्षा जास्त थंडी सहन करू शकतात. त्याकरिता अंजीर बागेची उत्तम निगा ठेवून अंजिराची झाडे निरोगी व कीडरहित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: