काम करण्याशिवाय पर्याय नसला तरी कधी-कधी कामाचा उत्साह नसतो. हि परिस्थिती तुम्हीही कधी ना कधी अनुभवली असेल. इतका कंटाळा येतो की जाऊ या का घरी, मित्रांसोबत थोडं रिलॅक्स होऊ या असं वाटून जातं. पण त्याक्षणी तरी ते शक्य नसतं. मग काय करायचं? तर त्यासाठी खालील सोपे उपाय अनुसरून तुम्ही या नकारात्मक मूड बदलू शकतो…
- ऑफिसमध्ये प्रचंड ताण असतो. आवडीची गाणी ऐकून हा ताण हलका करता येईल. थोडा वेळ ऑफिस कँटिनमध्ये बसून मस्तपैकी गाणी ऐका. शक्य असल्यास मोठ्याने गाणी लावा. मस्त एन्जॉय करा आणि मग कामाला लागा.
- हसल्याने ताण कमी होतो. त्यामुळे गमतीशीर व्हिडीओ बघा, जोक्स वाचा. किंवा ज्यामुळे तुम्हाला हसू येईल. असे काहीतरी करा.
- मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणींशी बोला. बोलल्यानंतर बरं वाटतं अशांना फोन करा. व्हॉटस्अॅप केलं तरी चालेल. गप्पा मारा, यामुळे तुम्ही थोंड रिलॅक्स व्हाल.
- ऑफिसमधील सहकार्यांसोबत थोडा वेळ भटकायला जा. टपरीवर एखादा चहा प्या. छोटीशी मैफिल जमवा.
- आजच्या कामांच्या यादीवर नजर टाका. काही करायचं राहिलं आहे का ते आठवा. कामाचं प्लॅनिंग करत बसा. यामुळे छान वेळ जाईल.
- दुसर्या दिवसाचं नियोजन करा. मित्रांनो, कामाचा कंटाळा आलेला आहे हे खरं. पण आत्ताच्या कामाला तुम्ही कंटाळला आहात हे ओळखा आणि ते टाळून दुसरं काम करा.
- गोष्ट, लेख किंवा पुस्तक वाचा. तुम्हाला आवडतो तो किंवा ऑनलाईन गेम्स खेळा, यामुळे तुमचा मुड नक्की बदलेल.