Ads
बातमीदार स्पेशल

मुंबईचे पहिले गृहमंत्री: कन्हैयालाल मुन्शी

डेस्क बातमीदार

पंकज राणे –  मुंबईचे पहिले गृहमंत्री म्हणून ओळखले जाणारे कन्हैयालाल मुन्शी हे एक भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, लेखक, पत्रकार, व शिक्षणतज्ज्ञ होते. ते पेशाने वकील होते व त्यानंतर ते साहित्य व राजकारणाकडे वळले.गुजराती साहित्यात त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. भारतीय विद्या भवन ही प्रसिद्ध शिक्षणसंस्था त्यांनी 1938 साली स्थापन केली.

 जन्म व शिक्षण :

कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म 30 डिसेंबर 1887 रोजी गुजरातमधील भरोच येथील उच्चशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. एक हुशार विद्यार्थी असलेल्या मुंशी यांनी पुढे चालून कायद्याचा अभ्यास केला. बॅचलर ऑफ लॉ नंतर त्यांनी मुंबई येथे सराव केला. पत्रकार म्हणूनही ते यशस्वी झाले.

 मुंशी यांचे कार्य :

  • मुंशी हे 1915 मध्ये गांधीजींसोबत यंग इंडियाचे सह-संपादक झाले. त्यांनी इतरही अनेक मासिकांची संपादने केली.
  • गुजराती साहित्य परिषदेत त्यांना महत्त्वाचे स्थान मिळवले आणि 1938 च्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या काही मित्रांसह भारतीय विद्या भवनची स्थापना केली.
  • हिंदीमधील ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरी आणि कथा लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी प्रेमचंद यांच्याबरोबर हंस या मासिक पत्रिकाची संपादन जबाबदारीही घेपार पाडली.
  • 1952 ते 1958 पर्यंत ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. वकील, मंत्री, कुलगुरू आणि राज्यपाल अशा महत्त्वाच्या पदांवर काम करत असताना त्यांनी 50 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
  • यात कादंबऱ्या, कथा, नाटक, इतिहास, ललित कला इत्यादी विषयांचा समावेश आहे. 1956 मध्ये त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले.
  • दरम्यान, 8 फेब्रुवारी 1971 रोजी कन्हैयालाल मुंशी यांचे निधन झाले. आणि एक साहित्यिक राजकीय युगाचा अंत झाला.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: