फास्टफूडच्या जमान्यात बहुतांश मुलांना पालेभाज्या आवडत नाहीत. मग मुलांना या भाज्यांमधील मिळावे म्हणून काय करू शकता? तर सूप देऊ शकता. आज असेच एक पौष्टिक सूप पाहुयात…
साहित्य :
छोटी पालकाची जुडी, 1 टोमॅटो, 1 बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, 3-4 मिरी दाणे
कृती :
छोटी पालकाची जुडी, 1 टोमॅटो, 1 बेबी पोटॅटो, कांद्याची मोठी फोड, 3-4 मिरी दाणे हे सगळं कुकरमध्ये वाफवून घ्या. शिजल्यावर गार झाल्यावर मिक्सरमधून काढून बारीक करून घ्या. थोडेसे पाणी घालून उकळून घ्या. आणि आवडत असल्यास वरून थोडी साय किंवा लोणी घाला.