Ads
हेल्थ वेल्थ

चालण्याचे फायदे जाणून घ्या ! गंभीर आजारांपासून होईल सुटका

walking excise
डेस्क desk team

सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. पण निरोगी राहण्यासाठी व्यायामाची आपल्या शरीराला सवय असणे गरजेचे आहे. त्यासाठी पैसे खर्च करून जिम लावली जाते. पण पुरेसा वेळ जिममधील वर्कआऊटला देता येत नसल्याने काहीवेळा पैसे फुकट गेल्या सारखे वाटले. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक पण पैसा खर्च न करता निरोगी राहण्याचा व्यायामाचा प्रकार सांगणार आहोत. या व्यायामाचे नाव आहे ‘पायी चालणे’.

सतत गाडीचा वापर करणे यामुळे आपण पायी चालणे एकप्रकारे विसरून गेले आहोत. पण हा व्यायामाचा सर्वोत्तम प्रकार आहे. व त्याचे शरीराला निरोगी ठेवण्याचे फायदे सुद्धा आहेत. तर पाहुयात चालण्याचे गुणकारी फायदे…

 • शरीर सुदृढ, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार.
 • सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा शरीराला होणारा पुरवठा.
 • हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते.
 • चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
 • सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
 • चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत.
 • चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
 • एकाग्रता आणि चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
 • वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार सर्वात उत्तम.
 • चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते.
 • चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
 • दररोज एक तास चालल्यास संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
 • चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
 • नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते.
 • नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
 • नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: