रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेतला जातो. तर दरवेळी प्रमाणे या रविवारी, 29 डिसेंबरला सुद्धा रेल्वेच्या मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर दिवसकालीन ब्लॉक आणि पश्चिम मार्गावर रात्रकालीन ब्लॉकची घोषणा करून दिवस कालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे 15 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर.
- ब्लॉकमुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकलचा थांबा नसेल.
- तर सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लोकल फेऱ्या 15 मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत अप-डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे.
परिणामी
- ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी बेलापूर पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद.
- प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान शनिवारीच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत अप-डाऊन धीमामार्गावर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.
परिणाम
- ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर.
- काही लोकल फेऱ्या रद्द, काही लोकल विलंबाने.
विशेष रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकातील पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी विद्याविहार-मुलुंड दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवारच्या मध्यरात्री 12 ते रविवारच्या पहाटे 5 वाजेपर्यंत विषेश ब्लॉक असणार आहे. तसेच ब्लॉक काळात शनिवारी रात्री 11.10 नंतर धावणाऱ्या जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर धावणार आहेत.