सैराट फेम अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरूच्या आगामी ‘मेकअप’ चित्रपटातीच्या पोस्टरवरून तिचा लूक समोर आला आहे.
असा आहे पोस्टरवरील लूक
- पोस्टरमध्ये काचेच्या इमारतीजवळ पारंपरिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात दिसत आहे.
- यात रिंकूचे दोन वेगळे चेहरे दिसणार आहेत. यात समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे.
- बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी तिच्या जगण्याची दुसरी बाजू आहे.
चित्रपटाविषयी
- निर्माता : दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग
- सहनिर्माता : केतन मारू, कलीम खान
- लेखन-दिग्दर्शन : गणेश पंडित
टिझर पाहण्यासाठी
दरम्यान, हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2020 रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.