पंकज राणे – अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला गुडन्यूज हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊयात कसा आहे चित्रपट…
कथानक काय?
- चित्रपटाचे कथानक दोन जोडप्यांवर आधारित आहे, IVF तंत्रज्ञानाने बाळाला जन्म देण्यासाठी दोन्ही जोडपे प्रयत्नशील असतात. मात्र दोन्ही जोडप्यांचे आडनाव सारखेच असल्याने यातून उडालेला गोंधळ चित्रपटातून दाखवण्यात आला आहे.
- मुंबईत राहणारे दीप्ती आणि वरून (करिना व अक्षय) आणि दुसरीकडे बिनधास्त असलेले पंजाबी जोडपे हनी आणि मोनिका (दिलजीत व कियारा ) हे दोन जोडपे IVF तंत्रज्ञानाने बाळाला जन्म देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
- मात्र दोन्ही जोडप्यांचे आडनाव बत्रा अर्थात सारखेच आडनाव असल्याने पुढे जो गोंधळ उडतो, आणि त्यातून काय गंमती घडतात, यासाठी पूर्ण चित्रपट बघणे आवश्यक ठरते.
चित्रपट कसा आहे?
हा चित्रपट मनोरंजनाचा परिपूर्ण डोस असून पैसे वसूल आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. चित्रपटात चारही मुख्य भूमिका असलेल्या कलाकारांनी चांगला अभिनय केला आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाचे संवाद आणि कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. परिपूर्ण मनोरंजन अनुभवण्यासाठी हा चित्रपट सहकुटुंब बघण्यास हरकत नाही.
चित्रपटाला स्टार
3.5