दरवर्षी सरत्या वर्षातील दु:ख,आनंददायी गोष्टी, अपेक्षा, आठवणी घेऊन किंवा काही गोष्टी मागे ठेवून नव वर्षाचे स्वागत करतो. तसेच नव वर्षाच्या सुरूवातीला अनेक गोष्टींचे संकल्प करत असतो. मात्र, स्वत:चे व आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासंबंधीतले संकल्प केल्याचे दिसत नाही. त्यामुळे आरोग्याच्या दुष्टीकोनातून 2020 हे वर्ष सरत्या वर्षापेक्षा चांगले कसे करावे? याकडे लक्ष दिले पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला आरोग्यासंबंधीत असे नव वर्षाचे संकल्प सांगणार आहोत. ज्यामुळे नव वर्षातील तुमचे आरोग्य निरोगी आणि आनंदी राहिल.
- सर्वप्रथम नववर्षात निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहाराचा एक चार्ट बनवा. यासह, न्याहारी, दुपारचे जेवण, स्नॅक्स आणि डिनरसाठी वेळ निश्चित करा आणि दररोज वेळेत पूर्ण करा. डाएट चार्टच्या मदतीने तुम्ही अनहेल्दी गोष्टी खाणे टाळाल. यासह पुन्हा पुन्हा स्नॅक्स खाण्याच्या सवयीला ही आळा बसेल.
- बहुतेक लोक पोटासाठी नाही तर मन भरे पर्यंत खात असतात. पण हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. बरेच लोक खाताना फोन वापरतात आणि काहींना टीव्ही पाहताना खाण्याची सवय असते, परंतु यामुळे आपण ओवरईटिंग करता हे कळत नाही त्यामुळे असे करणे टाळा.
- सुदृढ राहण्यासाठी आठवड्यातून एकदा उपवास करणे आवश्यक आहे. 3 ते 12 तासांदरम्यान खा आणि उर्वरित वेळ उपवास करा. पण यावेळी, आपण फळांचा रस, दूध इत्यादी पदार्थांचे सेवन करा. रात्री उशिरा स्नॅक्स खाण्याची सवय टाळा. उपवास केल्याने शरीरातून अतिरिक्त चरबी बर्न होते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
- आपल्या दैनंदिन आहारामध्ये प्रोटीनयुक्त आहार समाविष्ट करण्याचा संकल्प करा. वास्तविक, प्रोटीने समृद्ध असलेला आहार आपली त्वचा, स्नायू, हाडे आणि केसांच्या वाढीस मदत करते. प्रोटीन शरीरातील मांसपेशींचं संरक्षण करते आणि मेटाबॉलिज्मला अधिक उत्तम ठेवते. तर दैनंदिन आहारात दही, अंड्याचा पंधरा भाग, शेंगदाणे, कोंबडी आणि कडधान्यांचा समावेश केल्यास त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.
- स्वत: ला निरोगी ठेवण्यासाठी, आपल्या आहारात बदल करा आणि नवीन वर्षात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचे सेवन करा. त्यातून मिळणाऱ्या पोष्टीक घटकांमुळे निरोगी आरोग्य लाभेल.