Ads
बातम्या

Happy Birthday स्पेशल: सलमान खान; बॉलिवूडचा ‘दबंग सुपरस्टार’!

डेस्क desk team

पंकज राणे – बॉलिवूडमध्ये दबंग खान अशी ओळख असलेल्या सलमान खानचा आज 54 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण जाणून घेऊ या सलमानच्या प्रेमप्रकरणाविषयी काही खास गोष्टी…

सलमान आणि त्याची चर्चित प्रेमप्रकरणे :

  • संगीता बिजलानी : संगीता बिजलानीला सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड म्हंटले जाते. संगीता ही एक मॉडेल होती. या दोघांची मैत्री नंतर प्रेमात बदलली. संगीताला सलमानशी लग्न करायचे होते. पण सलमान यासाठी तयार नव्हता, त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. आजही सलमान आणि संगीता चांगले मित्र आहेत.
  • सोमी अली : सलमानवर प्रचंड प्रेम करणारी आणि कराचीमध्ये जन्मलेली सोमी अली वयाच्या 16 व्या वर्षी सलमानला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. मुंबईत आल्यानंतर तिने मॉडलिंगकडे आपला मोर्चा वळवला. काही दिवसांतच ती सलमानच्या संपर्कात आली. पण त्यांची प्रेमकथा सुरू होण्याआधीच संपली.
  • ऐश्वर्या राय बच्चन : सलमान-ऐश्वर्या ही बॉलिवूडमधील ऐतिहासिक जोडी आहे. दिग्दर्शक संजय लिला भंसाळींच्या ‘हम दिल दे चूके सनम’ चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदा एकत्र आले होते. ऐश्वर्या येताच सलमानची वागणूक अचानक बदलली. एकेकाळी एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे हे जोडपे लग्नाच्या मंडपा पर्यंत पोहचू शकले नाही.
  • कॅटरिना कैफ : कॅटरिना कैफने सलमान सोबत ‘मैंने प्यार क्यू किया’ हा चित्रपट केला. आणि त्यानंतर सलमान आणि कतरिनाच्या लग्नाच्या तारखांची बर्‍याचदा घोषणा झाली, पण प्रत्येक वेळी ही चुकीची ठरली. कतरिना कैफनेही सलमानबरोबर स्वप्न पाहिले होते, पण सलमानने याबद्दल काही निर्णय घेतला नाही.
  • लुलिया वंतूर : गेल्या काही महिन्यांपासून सलमानचे नाव रशियन अभिनेत्री लुलिया वंतूर हिच्याशी जोडले जात आहे. लुलिया सलमानच्या घरगुती कार्यक्रमांमध्येही सहभागी होते. त्यामुळे या दोघांच्या नात्यांची जोरदार चर्चा आहे.
  • क्लॉडिया सिएस्ला : क्लॉडिया सिएस्ला एक मॉडेल आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत तिने आयटम सॉन्ग केले होते. ती सलमान खानची गर्लफ्रेंड देखील होती.
  • स्नेहा उल्ला : हुबेहूब ऐश्वर्या सारखी दिसणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाने ‘लकी’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिच्या आणि सलमानच्या नात्याच्या चर्चा देखील फार रंगल्या होत्या.
  • झरीन खान : झरीन खान ही एक भारतीय अभिनेत्री आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारी मॉडेल आहे. ‘वीर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या झरीन आणि सलमानच्या नात्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या रंगल्या होत्या.
  • डेज़ी शाह : मागील काही दिवसांपूर्वी सलमान खानची डेज़ी शाहसोबत चांगलीच मैत्री जमली होती. दोघेपण एकमेकांसोबत बराच वेळ घालवीत असत, त्यांची मैत्री बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसले नाही.
  • अ‍ॅमी जॅक्सन : ब्रिटीश-भारतीय मॉडेल ही अभिनेत्री आहे. ती दक्षिणच्या चित्रपटसृष्टीत खूप सक्रिय असते, अ‍ॅमी आणि सलमान या दोघांची चांगली मैत्री आहे, अ‍ॅमी सलमानबरोबर काम करण्यास नेहमी अस्वस्थ असते. सलमानसोबत अ‍ॅमीच्या अफेअरची अफवा खूप दिवसांपासून आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: