राज्यात हळुहळु गुलाबी थंडीला सुरूवात झाली आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे असंख्य नागरिकांना थंडीच्या मोसमात सर्दी-खोकला, ताप सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. हे आजार लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच होतात. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेच आहे. तसेच अशा आजारांना त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. तर पाहुयात शरीराला विपरीत परिणाम होणार नाही असे काही घरगुती उपाय…
- अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म मनुक्यात असल्यामुळे ताप कमी होतो. आपण अर्धा कप पाण्यात साधारण 25 मनुका एक तासांसाठी भिजत घालून ठेवा. मनुका मऊ झाल्या की थोड्या क्रश करून त्यातील पाणी काढून टाका. अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला, आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.
- शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करण्यास मदत करते. हे लघवीचे प्रमाण वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. विषाणूजन्य ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण तांदळाच्या पेजेचा वापर करू शकता.
- जर आपण भारतीय असाल तर आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि काही मिनिटे ताप आलेल्या माणसांच्या पायांवर 2 ते 3 तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते.
- लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे. आपण लिंबू रस 1 टेबल स्पून आणि मध 1 टेबल स्पून असे मिश्रण करा. चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या. त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल.