Ads
स्पोर्टस

दशकातील आवडता कर्णधार कोण? ICC ने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आले…

Virat-Dhoni-Rohit
डेस्क desk team

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने क्रिकेट चाहत्यांना दशकातील सर्वोत्तम कर्णधार निवडण्याची संधी दिली होती. ICCच्या या प्रश्नाला चाहत्यांनी उत्तर दिले आहे. यात चाहत्यांनी भारतीय क्रिकेटपटूची निवड केली आहे. या खेळाडूचे नाव आहे, भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी. वर्ल्डकप नंतर क्रिकेटच्या मैदानापासून एम.एस. धोनी लांब असला तरी चाहत्यांच्या मनात त्याचे स्थान अढळ असल्याचे सिद्ध झाले आहे.

MS Dhoni ने सर्वप्रथम 2004 सालापासून भारतीय संघामधून खेळण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीला धोनी अपयशी ठरला. पण काही काळातच त्यांनी आपल्या खेळावर जम बसवला आणि त्यानंतर आपल्या उत्कृष्ट खेळीमुळे कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्याकडे आली.

धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप, 2011 साली वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2014 साली कसोटीचे आणि 2017 रोजी वनडे क्रिकेटचे कर्णधारपद सोडले.

याव्यतिरिक्त IPL मध्येही धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 2010, 2011 आणि 2018 साली विजेतेपद मिळवले होते. तेसच चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेचे 2010 आणि 2014 मध्ये विजेतेपद धोनीने मिळवून दिले होते.

धोनीने वनडेमध्ये 10 हजार 773 धावा आणि 444 गडी बाद केले आहेत. तर कसोटी सामन्यात त्यांनी 4 हजार 876 धावांसह 294 गडी बाद केले आहेत. तसेच टी-20 सामन्यात त्यांनी 1 हजार 617 धावा आणि 91 गदी बाद केले आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: