भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विस्डनच्या क्रिकेटर्स ऑफ डिकेड या यादीत विराटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यादीत विराटसह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
“गेल्या १० वर्षात विराट कोहलीने तब्बल ५ हजार ७७५ धावा ठोकल्या आहेत. ५ वर्षांच्या कालावधीत विराटने ६३ च्या सरासरीने धावा काढल्या असून या दरम्यान त्याने २१ शतकं आणि १३ अर्धशतकं झळकावली आहेत. याच कारणासाठी विराटचा या यादीत सहभाग करण्यात आलेला आहे”, वीसडेनने स्पष्टीकरण दिले.
विस्डनच्या क्रिकेटर्स ऑफ डिकेड या यादीत विराटचा टॉप 5 खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. विराट कोहलीसोबत डेल स्टेन, एबी डिव्हीलियर्स, स्टिव्ह स्मिथ आणि महिला क्रिकेटपटू एलिस पेरीचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विस्डनच्या यादीतील सर्वोत्तम क्रिकेटपटू
- अॅलिस्टर कूक (इंग्लंड)
- डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
- कुमार संगाकारा (श्रीलंका)
- स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
- विराट कोहली (भारत)