भारतामधील अनेक शहरांमधून 2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण आज 26 डिसेंबरला पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात कंकणाकृती असून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील काही भागातही दिसणार आहे. देशभरातील अनेक मंदिरे काल (दि. 25) रात्री 8 वाजताच बंद करण्यात आली. तर गुरुवारी असलेल्या सूर्यग्रहणाच्या काळात देशभरातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत.
Kerala: Solar eclipse begins; latest visuals from Kochi. pic.twitter.com/qdt0O52ZiX
— ANI (@ANI) December 26, 2019
ग्रहण पाहताना
● कोणत्याही सबबीवर उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये.
● दुर्बिणी, साधे गॉगल्स, काळ्या काचा, एक्सरे फिल्मस, सीडी यातून ग्रहणे पाहू नयेत त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
● ग्रहण बघण्यासाठी बनवलेला ग्रहण चष्मा किंवा पिन होल कॅमेरा यातूनच ग्रहण पहावे.
कोणत्या देशांमधून दिसणार?
भारत I सौदी अरेबिया I कतार I मलेशिया I ओमान I सिंगापूर I श्रीलंका I मरिना बेटे I बोरनिओ
भारतात कधी दिसणार?
ग्रहणाला भारतात सकाळी 7.59 वाजता सुरुवात होणार तर कंकणाकृती अवस्था सकाळी 9 वाजून 4 मिनिटांनी दिसणार आहे. पूर्ण ग्रहण स्थिती सुटण्यास दुपारी साडेबारा वाजता सुरुवात होईल, दुपारी 1.35 वाजता खंडग्रास अवस्थेतून तो बाहेर पडेल.