राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छूक व पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा योग्य फायदा उचलावा. तसेच ही भरती संपूर्ण भारतासाठी असून 12 जानेवारी 2020 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
पद आणि जागा
सदर भरती कार्यालय परिचक-ग्रुप सी (ऑफिस अटेंडंट) यापदासाठी एकूण 73 जागांसाठी असणार आहे. तसेच अर्ज करण्यासाठी General/OBC साठी 450 रूपये तर SC/ST/PWBD/ExSM साठी 50 रूपये शुल्क आकारण्यात आला आहे.
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता
दरम्यान, ही भरतीसाठी 18 ते 30 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. तर SC/ST साठी 5 वर्षांची सूट आणि OBC साठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर 10वी उत्तीर्ण असणाऱ्यांना ही संधी असणार आहे. तसेच यापदासाठी ऑनलाइन परिक्षा फेब्रुवारी महिन्यात असणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा