सरत्या वर्षाच्या शेवटाला व नव वर्षाच्या स्वागतला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.पुढल्या वर्षी काय करायचे, काय खरेदी करायचे याचे प्लॅनिंग सगळ्यांनीच केले असेल. पण वर्षाच्या सुरूवाती पासूनच सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण येत्या 1 जानेवारी 2020 मध्ये आर्थिक गोष्टींबाबात मोठे बदल करण्यात आले असून वस्तूंच्या किंमतीही वाढविण्यात आले आहे. यात इलेक्ट्रिक प्रोडक्ट्स, ऑटो सेक्टर आणि खाद्यपदार्थांच्या किंमतीतही वाढ होणार आहेत.
जागतिक स्तरावर TV यांच्या किंमतीत 15-17 टक्क्यांनी वाढ होणार असून त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच टेलिव्हिजनच्या किंमतीत जबरदस्त वाढ होणार आहे. तर फाइव्ह स्टार रेफ्रिजरेटरच्या उत्पादनात 6 हजार रुपयांना महागणार आहे.तसेच तेल, लसूण, तिळ यासारख्या अन्य वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार आहे. एफएमजीसी कंपन्या नेस्ले आणि आयटीसी, पार्ले त्यांच्या प्रोडक्ट्सच्या किंमतीत वाढ करण्याऐवजी पॅकेटचा आकार कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षी कार घेण्याच्या तयारीत असणाऱ्यांना महागात पडणार आहे. ह्युंडाई आणि रेनॉल्ट कंपनीच्या कार मॉडेल महागल्या आहे.या महागायीमुळे नव वर्षाच्या सुरूवातीपासूनच सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर प्रत्येक गोष्ट विचार करून खरेदी करावे लागणार आहे.