भारतीय क्रिकेट संघाने व संघातील सर्वच खेळाडूने 2019 वर्षी शानदार कामगिरी केली. वर्ल्ड कप व्यतिरिक्त सर्वच सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली. घरच्या मैदानात असो वा परदेशी दैऱ्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि टीमने सर्वोत्तम संघ असल्याचे सिद्ध केले. तसेच वर्षाच्या शेवटीही टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकामध्येही विजय मिळवला.
पण आता 2019 प्रमाणे 2020 वर्षीच्या सुरूवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यात भारतीय संघ एकूण तीन संघांसोबत खेळणार आहे. हे तीन संघ म्हणजे श्रीलंका, ऑस्ट्रोलिया आणि न्यूझीलंड हे दिग्गज संघ आहेत. भारतीय संघाला जानेवारीमध्ये घरच्या मैदानात व परदेशात असे 10 सामने खेळायचे आहेत. तर पाहुयात जानेवारी मध्ये क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी…
श्रीलंकेविरुद्ध टी-20
5 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी)
7 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर)
9 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे
14 जानेवारी: पहिली वनडे (मुंबई)
17 जानेवारी: दुसरी वनडे (राजकोट)
19 जानेवारी: तिसरी वनडे (बेंगळुरू)
न्यूझीलंडविरुद्ध टी-20
24 जानेवारी: पहिली टी-20 (ऑकलंड)
26 जानेवारी: दुसरी टी-20 (ऑकलंड)
29 जानेवारी: तिसरी टी-20 (ऑकलंड)
31 जानेवारी: चौथी टी-20 (ऑकलंड)