नालासोपारा पूर्वेत पालिकेच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाडीने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेनंतर वाहनचालक फरार झाला होता. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात महापालिकेच्या घंटागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्वेतील टाकीरोड येथील महापालिकेची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी जात असताना मागच्या चाकाला दुचाकीची धडक बसली. या धडकेत अनिकेत हरकेश सिंह (20) याचा जागीच मृत्यू झाला तर नितीश कुमार द्विवेदी 20 याच्या डोक्याला जबर मार बसला होता. त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साधारण रात्री अडीच वाजता हा अपघात झाला होता.या घटनेनंतर घंटागाडीच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढत फरार झाला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा चालकचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.