Ads
लाईफस्टाईल

उद्या दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण;असे पाहता येणार!

solar eclipse
डेस्क desk team

सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की चंद्राच्या झाकले जाण्यामुळे सूर्यग्रहण होते. वर्षातून दोन किंवा जास्तीत जास्त  पाच ग्रहण होतात. तर सरत्या 2019 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबर, गुरूवारी असणार आहे. या दिवशी एक कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारताकडील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यातील काही शहरात तर महाराष्ट्रासह इतर संपूर्ण भारतात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. 296 वर्षांपूर्वी 7 जानेवारी 1723 रोजी पाहण्यात आलेला दुर्मिळ सूर्यग्रहण 26 डिसेंबर 2019 ला पाहायला मिळणार असल्याने ही नागरिकांसाठी एक पर्वणी आहे.

ग्रहणाची वेळ

भारतीय वेळेनुसार सकाळी 8.17 वाजेपासून 10.57 वाजेपर्यंत म्हणजेच ग्रहण साधारणत: 3.30 तासाचा असणार आहे. तसेच या ग्रहणाचा प्रभाव नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, चीन ऑस्ट्रेलिया या देशानाही दिसून येणार आहे.

कसे पाहावे? 

प्रत्येक सूर्यग्रहण हे पाहण्यासाठी नागरिक उत्साही असतात. सूर्यग्रहण पाहण्यासाठी सतत सतत सूर्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यामुळे आपल्या नाजूक डोळ्यांवर ताण पडतो व त्यामुळे डोळे अर्ध किवा कायमचे निकामी होण्याची शक्यता असते. तसेच डोळ्यात ब्लाइंड स्पॉट निर्माण होणे, डोळ्यांच्या रंग पाहण्याच्या क्षमतेत फरक असते त्यामुळे योग्य प्रकारे ग्रहण बघण्याची पद्धती जाणून घेणार आहोत.

  • मायलर फिल्मपासून ग्रहण चष्मे बनवले जातात. ते वापरू शकतो.
  • वेल्डिंग साठी वापरण्यात येणारी काच
  • पिन होल कॅमेरा- यापैकी पिन होल कॅमेरा आपण घरच्या घरी बनवू शकतो. हा अगदी सोपा कमी खर्चिक असून लहान मुलेसुद्धा बनवतात.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: