सरत्या वर्षात भारतीय संघानी उल्लेखनीय कामगिरी केली. वर्ल्ड कप वगळता बहुतेक सगळ्याच सामन्यात भारतीय संघाने अव्वल स्थान गाठले. तर आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने 2019 वर्षातील अंतिम कसोटी सामना संपताच दशकातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा केली आहे. या संघात 2010 ते 2019 या दशकातील उत्कुष्ट खेळी करणारे वेगवेगळ्या संघातील अकरा जणांची निवड करण्यात आली आहे. तर विशेष म्हणजे या संघाचे कर्णधार पदाचा बहुमान भारतीय संघातील एका क्रिकेटपटूकडे देण्यात आला आहे.
दशकातील सर्वोत्तम कसोटी संघात गेल्या दहा वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. यात निवृत्ती घेतलेल्या पण सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूनाही स्थान दिले आहे.
संघाबद्दल बोलायचे झाले तर संघात सर्वात जास्त खेळाडू हे इंग्लंडचे आहेत. यात इंग्लंडचा सलामीचा फलंदाज अॅलेस्टर कुक, अष्टपैलू बेन स्ट्रोक्स, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅडरसन यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूने सर्व कसोटी सामन्यात शानदार कामगिरी केली आहे.
तसेच या संघाचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूकडे न देता भारतीय खेळाडूकडे दिली आहे. हा खेळा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहलीने कसोटी समान्यात कर्णधार म्हणून संघाला मोठे विजय मिळून दिले आहे. तर विराट कोहली शिवाय कोणत्याच खेळाडूला या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
पाहुयात संघ
विराट कोहली (कर्णधार), अॅलेक्टर कुक, डेव्हिड वॉर्नर, केन व्हिल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, बेन स्ट्रोक्स, डेल स्टेन, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अॅडरसन आणि नाथन लयोन