Ads
ओपन मांईड

‘या’ चर्चमध्ये 200 वर्षात प्रथमच होणार नाही नाताळ प्रार्थना

church
डेस्क desk team

नोत्रे डेम कॅथेड्रल या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या 850 वर्षे जुन्या चर्चमध्ये यंदा 200 वर्षात प्रथमच नाताळची प्रार्थना होणार नसल्याचे जाहीर केले आहे. फ्रान्सच्या पॅरीस मध्ये हे चर्च असून एप्रिलमध्ये ते आगीच्या भक्षस्थानी पडून त्याचे मोठे नुकसान झाले होते.

चर्च प्रवक्ते एन्द्रे फिनोट म्हणाले;

● 1803 नंतर प्रथमच या चर्चमध्ये ख्रिसमस मास होणार नाही.
● एप्रिलमध्ये चर्चला लागलेली आग सिगरेट किंवा शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज होता.

विशेष : दुसरे महायुद्ध झाले तेव्हा या चर्चचा ताबा नाझी सैनिकांकडे होता, तेव्हाही येथे ख्रिसमस मास झाला होता.

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांनी 13 व्या शतकातील हे चर्च आगामी 5 वर्षात होते तसे पुन्हा उभारले जाईल अशी घोषणा यापूर्वीच केली आहे

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: