Ads
बातम्या

कोकण रेल्वेेच्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!

Konkan Railway
डेस्क desk team

काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे. तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तर नविन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व नागरिक सज्ज झाले आहे. यावेळी कोकणात व गोव्यात मोठ्या संख्येनी पर्यटक फिरण्यासाठी व सुट्ट्यांची मज्जा लुटण्यासाठी जात असतात. मात्र, यंदा या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे कोकण रेल्वेवर येत्या 27 डिसेंबरला मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. ही माहिती खुद्द कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

सदर कोकण रेल्वेकडून घेण्यात येणारा ब्लॉक हा शुक्रवार 27 डिसेंबरला निवसर ते विलवडे स्थानका दरम्यान मध्यरात्री 11.45 वाजेपासून ते 28 डिसेंबरला पहाटे 7.45 वाजेपर्यंत तब्बल आठ तास असणार आहे. दरम्यान हा ब्लॉक रत्नागिरी जिल्ह्यातील आडवली रेल्वे स्थानतावर लूप लाइन नं.2 चे काम करण्यासाठी घेण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेक़डून घेण्यात आलेला ब्लॉकचा फटका त्यामार्गावर धावणाऱ्या 10 रेल्वेना बसला असून त्यामुळे प्रवाशांचीही गैरसोय होणार आहे.

या 10 रेल्वेना बसणार फटका

  • 12133 मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस
  • 16335 गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस
  • 22659 कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस
  • 10111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव
  • 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस
  • 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस
  • 11099 एलटीटी-मडगाव डबलडेकर
  • 19331 कोचुवेल-इंदूर एक्स्प्रेस
  • 50102 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर
  • 50101 रत्नागिरीड-मडगाव पॅसेंजर

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: