शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महा विकास आघाडी हे नवे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. तसेच सरकार स्थापनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला कोणत्या पक्षाला किती मंत्रीपद मिळतील, मंत्रिमंडळ विस्तार कधी पार पडेल याची उत्सुक्ता लागून राहिली होती. तर आता ही प्रतिक्षा संपली आहे.
नव्या सरकारकडून 12 डिसेंबरला खाते वाटप करण्यात आले होते. तर त्यानंतर आता महा विकास आघाडी सरकराकचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला दुपारी पार पडणार आहे.
असा होणार मंत्रिमंडळ विस्तार
दरम्यान, उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार असून यात 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचेही 13 मंत्री शपथ घेतील, यात 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री असणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षातील 10 मंत्री शपथ घेणार असून त्यात 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री असतील.