साधारण 16 ते 38 पर्यंतचा काळ हा मानवी शरीराचा तारुण्यावस्थेतला काळ असतो. या काळात शरीराची वाढ होत असते, रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते, शक्यतो या वयात आजारांचा धोका कमी असतो. मात्र 40 नंतर मानवी शरीराला उतरती कळा लागते. चाळीशी नंतर बहुतेक लोकांना अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. तसेच वाढते प्रदुषण, केमीकल युक्त खाणे या सगळ्याचा मानवी आरोग्यावर चाळीशी नंतर लवकर परिणाम होतो. अस म्हंटल जात ‘Health is wealth’, किंवा हिंदीत म्हण आहे ‘सर सलामत तो पगडी पचास’ तेंव्हा चाळीशी नंतर खाण्या-पिण्याच्या सवयी तसेच जीवन शैलीत बदल करा. तेंव्हा चाळीशी नंतर होणारे आजार आणि त्रास टाळायचा असेल तर हे फॉलो करा.
चीर तरुण राहण्याचा मंत्र
काय खावे : चाळीशी नंतर सगळ्यात आधी रोजच्या आहारात बदल करावा. भात खाणे कमी करावे त्याजागी फळे, पौष्टीक पदार्थे, हिरव्या भाज्या आणि दुग्ध जन्य पदार्थ खावेत. शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी मासे, अंडी, सोयाबिनचे पदार्थ खावेत.
काय खाऊ नये : जंक फुड खाणे शरीरासाठी कधीही घातकच असते. मात्र शक्यतो चाळीशी नंतर ते खाणे कटाक्षाने टाळावे. या वयात ह्रदय रोग, लठ्ठपणा टाळण्यासाठी चर्बी संक्रमणे, कोले स्ट्रॉल, मिठ तसेच जास्त गोड खाणे म्हणजेच साखर खाणे कमी करावे. रात्रीचा आहार कमी करावा, पचायला जड असलेले अन्न शक्यतो टाळावे.
जीवनशैलीत बदल
चाळीशी नंतर तरुण वयात एखादा अपघात, जबर मुक्का मार, जास्त श्रमाचे काम केले असेल, तर त्याचा त्रास या वयात हळुहळु जाणवायला लागतो. त्यामुळे सतत सुरु असलेली शारीरक प्रक्रिया तशीच सुरु ठेवल्याने स्नायुंना बळकटी येते. चाळीशी नंतर आठवड्यातुन किमान चार दिवस अर्धातास तरी व्यायाम करावा. त्याचबरोबर शतपावली, मॉर्निग वॉक, पोहणे यांसारख्या गोष्टी चाळीशीनंतर ही आपल्याला चिरतरुण ठेवतात.
कॉलेस्ट्रॉल वर नियंत्रण
वाढत्या वयाबरोबर कॉलेस्ट्रॉल वाढु न देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कॉलेस्ट्रॉल वाढीमुळे ह्र्दय रोगाचा धोका अधिक असतो. त्यामुळे अंडी, अंड्यातील पिवणा बलक, मलाई युक्त दुध अशा कॉलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या गोष्टी खाणे टाळा.
व्यसनांवर नियंत्रण
व्यसन करणे कधीही हानीकारकच, मात्र 40 नंतर धुम्रपान करणे तसेच मद्यपान करणे हळुहळु कमी केले पाहिजे.