प्रत्येक देशासाठी पंतप्रधान पद हे अत्यंत महत्वाचे असते. राष्ट्रपती हा प्रत्येक देशाचा प्रथम नागरिक असतो, मात्र राष्ट्रपती हा नामधारी असतो, तर पंतप्रधान हा प्रत्येक गोष्टीत देशासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो. सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाले असून, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सगळ्यांना माहित असून, जगातील सगळ्यात लोकप्रिय पंतप्रधान ठरले आहे. मोदींवरुनच देशासाठी पंतप्रधान पद किती महत्वाचे असते ते तुम्हाला कळले असेल, मात्र क्युबा या देशाला गेल्या 40 वर्षांपासून पंतप्रधानच नव्हता. 1976 नंतर तब्बल 40 वर्षांनी या देशाला पंतप्रधान मिळाला आहे.
का नव्हता इतकी वर्ष पंतप्रधान
क्युबाचे क्रांतीकारी नेत फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाचे राष्ट्रपती पद सांभाळले. मुलांच्या लैंगिक शोषणावरील आंदोलनानंतर त्यांनी 1959 साली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करत 1976 पर्यंत ते पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी देशाचे सर्वेसर्वा म्हणून 1976 ते 2008 पर्यंत राष्ट्रपती म्हणून काम पाहताना पंतप्रधानाची निवडच केली नाही. यानंतर आपला भाऊ राहुल कॅस्ट्रोकडे त्यांनी राष्ट्रपती पदाची सुत्रे दिल्याने या कार्यकाळात देशासाठी पंतप्रधान निवडलाच गेला नाही. राज्यघटनेनुसार कम्युनिस्ट पक्षाला क्यूबामध्ये एकमेव राजकीय पक्ष म्हणून परवानगी आहे आणि सर्व सरकारी धोरणासाठी ते मार्गदर्शक शक्ती आहे.
Mil Gracias a Raul, al Partido, al Presidente Diaz-Canel, al Presidente Lazo y a los Diputados que en representación de todo el pueblo han confiado en mí para esta alta responsabilidad. Vamos a ejercer un gobierno por el Pueblo y para el Pueblo. #VamosPorMás. pic.twitter.com/gY6xSn09E8
— Manuel Marrero Cruz (@MMarreroCruz) December 22, 2019
कम्युनिस्ट पार्टी क्युबा मुळे पंतप्रधान
दरम्यान, क्युबामध्ये सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टीचे माजी राष्ट्रपती राहुल कॅस्ट्रोंच्या पाठिंब्यावर राष्ट्रपती असलेल्या मिगुएज डियाज केनल यांनी विधानसभेत पंतप्रधान पदासाठीचा प्रस्ताव मांडुन सर्वांच्या संमतीने पंतप्रधानाच्या निवडीच्या प्रस्तावावर सह्या केल्या. त्यामुळे क्युबा या देशाला 1976 नंतर तब्बल 40 वर्षांच्या काळानंतर क्युबाचे पर्यटनमंत्री मॅन्युअल मोरेरो यांच्या रुपाने देशाचा नवा पंतप्रधान मिळाला आहे. पर्यटन मंत्री असताना क्युबाच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी केलेल्या अमुल्य कामगिरीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसुन आल्याने कम्युनिस्ट पार्टी ऑफ क्युबाच्या राजनैतिक विभागाने त्यांची पंतप्रधान पदासाठी निवड केली. मरेरो जनतेच्या सेवेसाठी असून, कोणत्याही बदलासाठी या पदावर आले नसल्याचे माजी राष्ट्रपती कॅस्ट्रो यांनी स्पष्ट करत, नवीन पंतप्रधानांना अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या.