चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या सर्वोत्कृष्ट दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी बीग बी अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. चित्रपसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी यंदाच्या 66 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात उपराष्ट्रपती व्यंकया नायडु यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात येणार होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव अमिताभ बच्चन या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून सांगत, अनुपस्थितीती बाबत खेद व्यक्त केला आहे. यामुळे बीग बींच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
बीग बींच व्टिट
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आपल्याला ताप येत असल्यामुळे प्रवास करणे शक्य नसल्याचे व्टिटमध्ये म्हटले आहे. तसेच आपण या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहु शकत नसल्यामुऴे पश्चाताप व्यक्त केला आहे. 1969 साली ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटाने अभिनय क्षेत्रात प्रवेश केलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी यंदा चित्रपट सृष्टीत 50 वर्षांची अभिनय क्षेत्रातील यशस्वी कारकीर्द पुर्ण केली आहे. वयाची सत्तरी ओलांडणाऱे अमिताभ आजही चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधण घेणारे आणि मागणी असणाऱ्या कलाकारांच्या यादीत आपले स्थान कायम टिकवुन आहेत. त्यांच्या चित्रपट सृष्टीतील याच योगदाना बद्दल त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कर जाहिर झाला.
T 3584/5/6 –
Down with fever .. ! Not allowed to travel .. will not be able to attend National Award tomorrow in Delhi .. so unfortunate .. my regrets ..— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019
या चित्रपटांना पुरस्कार
दिल्लीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून, भोंगा या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान मिऴाला आहे, तर आयुष्यमान खुराना आणि उरी चित्रपासाठी विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अंधाधुन हा यावर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. यासह उर्दु, राजस्थानी यांसह इतरही भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.