Ads
बातम्या

समग्र अभियानाने विद्यार्थी गाठ्तायत प्रगती शिखरे

ABHIYAAN
डेस्क desk team

वसईत समग्र शिक्षण अभियानातून शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना रुग्णालये, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि नशामुक्ती केंद्रात कशाप्रकारे काम केले जाते याच प्रशिक्षण व अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. या अनुभवाने विद्यार्थ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार आहे.

एकात्मिक आदिवासी विभागातील शासकीय माध्य. व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बेलवाडी (भाताने) येथील आश्रमशाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत “हेल्थ केअर” हा व्यावसायिक अभ्यासक्रम २०१७ पासून सुरू करण्यात आला होता.  हा अभ्यासक्रम चार भागात विभागला गेला आहे.

या अभ्यासक्रमाच्या चौथ्या टप्प्यात इयत्ता ९ वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि नशामुक्ती केंद्रात काम करण्याची संधी मिळते. यामध्ये रुग्णांना कशी मलमपट्टी केली जाते,वृद्धाश्रमातील वृद्धांची व अनाथाश्रमातील अनाथांची कशी काळजी घेतली जाते याचे प्रशिक्षण या अभ्याक्रमातून विद्यार्थ्यांना दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान मिळावे या अनुषंगाने तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन ही लाभते.

केंद्र सरकार तर्फे समग्र शिक्षण अभियान राबवले जाते. यामध्ये आदिवासी भागातील मुल ही स्वतःच्या पायावर उभे राहून अधिक प्रगती करण्यास सज्ज होतील या हेतूने हा प्रकल्प सुरू आहे.

नर्सिंग कोर्ससाठी आरक्षण

“हेल्थ केअर”  या विषयातून १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) या क्षेत्रांतील शिक्षण घेण्यासाठी २५% आरक्षण आहे.

सदर अभ्यासक्रमातुन विद्यार्थी वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि नशामुक्ती केंद्रात आठवड्यातून दोन दिवस जाऊन वृद्धांची काळजी घेतात. ही सुरुवातच म्हणजेच समग्र शिक्षा अभियान, एकात्मिक आदिवासी विभाग आणि आमच्या सारख्या प्रशिक्षकांच्या कामाची पोचपावती आहे.

-प्रियंका कांबळे,व्यवसायिक प्रशिक्षिका

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: