सरते वर्ष टीम इंडीया आणि इंडीयाचा सलामिवीर ‘हिटमॅन’ रोहित शर्माने गाजवले. टी-20 मालिके पाठोपाठ वन-डे मालिकेतही भारताने विजय मिळवला. या वर्षातील शेवटची भारत-वेस्ट इंडिज विरूद्धची वन-डे मालिकाला भारताने 2-1 अशी जिंकली. तसेच विंडीज विरूद्धच्या वन-डे मालिकेत रोहित शर्माला मालिकावीर किताब मिळाला. मात्र, 2020 साली पहिल्याच दौऱ्यात रोहित शर्माला खेळताना पाहायला मिळणार नाही. तो विश्रांती घेत असल्याचे समजत आहे.
पुढील 2020 वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे 5 जानेवारी श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान भारत 3 टी-20 सामने खेळणार आहे. मात्र, या सामन्यात रोहत शर्मा गैरहजर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘निवड समिती टी-20 मालिकेत कोणाला विश्रांती देत नाही पण रोहितने 2019 मध्ये सलग सामने खेळले आहेत त्यामुळे खुद रोहितने बोर्डाला मला विश्रांतीची गरज असल्याचे कळवले. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळाला जाणाऱ्या वन-डे सामनात तो वापसी करणार आहे.’
भारत 2020 च्या सुरूवातीला श्रीलंका विरूद्ध टी-20 आणि ऑस्ट्रेलियासोबत वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. 2019 या वर्षात भारताने चांगली कामगिरी केल तर आता 2020 हे वर्ष भारतीय संघासाठी कसे जाते हे बघण औत्सुक्याचे ठरणार आहे.