Ads
समीक्षण

Review : कसा आहे सलमान खानचा ‘दबंग-3’

डेस्क desk team

अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘दबंग-3’ आज रिलीज झाला आहे. जाणून घेऊयात कसा आहे चित्रपट..

कथानक काय?

  • चित्रपटाची सुरुवात ऍक्शन आणि विनोदीपणे होते. चुलबुल पांडे (सलमान खान) हा पोलीस एका लग्नात लुटलेले दागिने मोठ्या शिताफीने परत मिळवतो.
  • यामध्ये त्याचा सामना खतरनाक माफिया किंगपीन बाली (किच्चा सुदीप) याच्याशी होतो. हा सामना करत असताना चुलबुलला त्याच्या भूतकाळाच्या सर्व जखमा आठवतात.
  • चुळबुळाच्या भूतकाळात बालीने त्याला अनेक यातना दिलेल्या असतात ज्यामुळे चुळबुळाच्या सर्व जखमा ताज्या होतात. ज्यातून त्याच्यात बदल्याची भावना प्रकट होते.
  • दबंग 3 सिनेमाची स्टोरी चुलबुल पांडेच्या भूतकाळाबद्दल आहे. यावेळी तो पहिल्यापेक्षा जास्त यंग दिसत आहे. सलमान खानसोबत रज्जो (सोनाक्षी सिन्हा) रोमांस करताना दिसत आहे.
  • चुलबुलचे कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचा बचाव आणि बालीशी सामना या सर्व गोष्टींना पुढे जाऊन काय रंग मिळतो? हे समजून घेण्यासाठी चित्रपट पूर्ण पाहावा लागेल.

● दिग्दर्शन : प्रभुदेवा
● कलाकार : सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर और किच्चा सुदीप

चित्रपट कसा आहे?

चित्रपटात आधीच्या दोन भागांच्या तुलनेत तोच तो पणा दिसून येतो. चित्रपटात फक्त खलनायक बदलला असून कथानकाला जुनापुराणाच रंग दिल्याचे आढळून येत आहे. दिग्दर्शक म्हणून चित्रपटाला नाविन्यपूर्ण रूप देण्यास प्रभू देवा सपशेल अपयशी ठरला आहे. चित्रपटाचे संगीतही जास्त विशेष नसून हा चित्रपट प्रेक्षकांना पसंद न आल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे.
 

रेटिंग
3

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: