भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात सुरु असलेल्या विषाखापट्टणम येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने दीड शतक आणि के.एल राहुल यांने दमदार शतक ठोकल आहे.त्याचबरोबर श्रेयस अय्यरने आणि रिशभ पंतच्या झटपट धावाणे भारताने विडिंज समोर 387 धावांचा डोंगर उभा केला आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने वेस्टइंडिज गोलादाजाना चोप चोप धुतला. आणि विंडीज संघासमोर जिंकण्यासाठी 388 धावांच तगड आवाहन दिल आहे. दरम्यान सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्टिंडिजचा कर्णधार केरॉन पोलार्डने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र के.एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी करत भारताला एक चांगली धावसंख्या उभारुन दिली.
करो वा मरोची स्थिती
दरम्यान, मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकणे आवश्यक आहे. विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियममधील खेळपट्टी ही फलंदाजांना अनुकूल मानली जाते. त्यामुळे विंडीजच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असणार आहे.
रोहित ने केला हा रेकॉर्ड
आजच्या सामन्यात रोहित शर्माने एकदिवसीय मालिकेतील 28 वे शतक ठोकले आहे. तसेच वेस्टइंडिज विरुध्द सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत रोहितने कोहली आणि धोनीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. त्याच बरोबर भारताने आतापर्यंत वेस्टइंडिज विरुध्द आता पर्यंत तिनदा एकदिवसीय सामन्यात व्दिशतकी भागीदारी केली असून, या तिनही भागीदारीत रोहित शर्माचा सहभाग आहे. त्याच बरोबर 2019 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ही रोहीत अव्वल स्थानी आहे. तसेच या वर्षात 1300 पेक्षा अधिक धावा करणारा रोहित पहिला फलंदाज ठरला आहे. आजच्या सामन्यात 138 चेंडुत 159 धावा करताना 17 चौकार आणि 5 षटकार लगावले
1️⃣5️⃣0️⃣ for Rohit 🔥
India have had three 2️⃣0️⃣0️⃣-run partnerships against West Indies in ODIs and this man has been involved in all three of them.#INDvWI pic.twitter.com/RgwWKvbrtM
— ICC (@ICC) December 18, 2019
रिशभ – श्रेयसची फटके बाजी
दरम्यान, विराच कोहली शुन्या वर बाद झाल्यानंतर व रोहित शर्मा झेल बाद झाल्यावर श्रेयस अय्यरने 53 धावा पु्र्ण केल्या तर रिशभ पंत 39 धावांवर झेल बाद झाला. मात्र तोपर्यंत भारताने 350 धावांचा पल्ला पार केला होता.