सध्या ऑनलाईन शॉपिंगला नागरिकांकडून अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. त्याच पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स संकेतस्थळ ग्राहकांना आकर्षित सेल वर्षभरात आयोजित केले जातात. तर आता लोकप्रिय ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टने ‘Year End sale’ सुरू होणार आहे. हा सेल येत्या 21 डिसेंबरला सुरू होणार असून 23 डिसेंबरपर्यंत असणार आहे. तर कंपनीने असा दावा सुद्धा केला आहे की, 2019 वर्षातील हा शेवटचा सेल फ्लिपकार्टचा बेस्ट ऑफर देणारा सेल ठरणार आहे.
ऑफर्स
- या सेलमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी जर ICICI बँकेच्या क्रेडिड कार्ड मधून पैसे भरल्यास त्यांना 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येणार, तर EMI वर सुद्धा ही सूट लागू होणार आहे.
- नो कॉस्ट एमआय आणि ऐक्सचेंज ऑफर सुद्धा देण्यात येणार आहे.
सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन्स
- सॅमसंग S9 स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा 62,500 रूपयांचा स्मार्टफोन 27,999 रुपयांना मिळेल
- सॅमसंग A30S हा 18,900 रूपयांचा स्मार्टफोन 15,999 रूपयांना मिळेल
- सॅमसंग A50 स्मार्टफोन 14,999 रुपयांना मिळेल
ओप्पो कंपनीचे स्मार्टफोन्स
- ओप्पो F11 Pro चा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणारा 29,990 रूपयांचा स्मार्टफोन 16,999 रूपयांपर्यंत खरेदी करता येणार
- ओप्पो A7 चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणार स्मार्टफोन 9,900 रूपयांपर्यंत खरेदी करता येणार.
याव्यतिरिक्त गुगल, असुस, नोकिया कंपनींचे स्मार्टफोन्स सोबत नुकतेच लाँच झालेले नवे स्मार्टफोनही या सेलमध्ये दमदार सूट मिळणार आहे. त्यामुळे सामान्यांचा खिशाला परवडतील अशा किंमतीत स्मार्टफोन सेलमध्ये उपलब्ध होणार आहेत.