दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याची राजधानी दिल्लीत गुलाबी थंडीची लाट आली आहे. दिल्ली करांना यंदा रेकॉर्ड ब्रेक थंडी अनुभवायला मिळत असून पारा 12 अंशावर पोहोचला आहे. गेल्या 22 वर्षातील ही सगळ्यात निच्चांकी तापमानाची नोंद असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, आज आणि उद्या वातावरण अशाच प्रकारे राहणार असून पारा 14 अंशाच्या खालीच राहिल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली करांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.
22 वर्षांपुर्वी इतकी थंडी
सध्याचे दिल्लीचे तापमान किमान 10.4 डिग्री अंश सेल्सिअस असून त्यात किमान 2 डिग्रीने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात केवळ 2 अंश सेल्सिअसचा फरक आहे. दिल्लीच्या नजफगड येथे सर्वाधिक 11.1 डिग्री इतक्या सर्वाधिक कमी तपमानाची नोंद सकाळच्या सुमारास करण्यात आली. याआधी 28 डिसेंबर 1997 साली दिल्लीत सर्वात कमी 11.3 इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या 22 वर्षातील रेकॉर्ड ब्रेक थंडीचा अनुभव दिल्लीकर घेत आहे.
शुक्रवारी पावसाची शक्यता
पश्चिम हिमालय क्षेत्रात सध्या बर्फ वृष्टी सुरु असून, हीच बर्फाळ हवा दिल्लीच्या दिशेने वाहात असल्याने वातावरण्यात इतका गारवा पसरला असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान किमान दोन दिवस वातावरणातील गारवा असाच कायम राहणार असून, तापमान 14 अंश सेल्सियस पर्यंत राहील. यानंतर शुक्रवारी तसेच शनिवार 20- 21 तारखेला पावसाच्या हलक्या सरी दिल्लीत कोसळण्याची शक्यता असून, पारा 18 अंशापर्यंत राहील असे हवामान विभागाने सांगितले आहे.