बोईसर तालुक्यात अनधिकृतपणे वास्तव करणाऱ्यावर 12 बांगलादेशींवर धाड टाकून अटक करण्यात आली आहे. या सर्व बांगलादेशींकडे भारतात अधिकृतपणे वास्तव्य करण्याच्या कुठलाही परवाना नव्हता म्हणून पालघर दहशतवाद विरोधी पथकाने हि कारवाई केली आहे.
तालुक्यातील यशवंतसृष्टी भागातील मोठ्या वसाहतीत नाका कामगारांमध्ये काही बांगलादेशी नागरिक मोलमजुरी करत असल्याची माहिती पालघर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार परिसरात धाड टाकून इस्माईल अखिल शेख (35 वर्षे), हिरोज अब्दुल्ला खान ( 36 वर्षे), इराण रहिमखान (50 वर्षे), राबिया नूर इस्लाम काझी ( 35 वर्षे), रानुमोल्ला तूतामिया शोदत्त ( 35 वर्षे), नूरजहाँ आक्षु शेख ( 30 वर्षे), माबिया इमरान शिकदार ( 40 वर्षे), सोनाली इक्ततार मुल्ला ( 24 वर्षे), शैनाज गाउज शेख (25 वर्षे), नाजिया टूटल शेख ( 34 वर्षे), शुमी रसेल शेख ( 32 वर्षे), शिरीना इस्टनफिल शेख ( 25 वर्षे) अशा 12 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यामध्ये 9 महिला तर 3 पुरुष असल्याची माहिती आहे. या बांगलादेशीकडून पोलिसांनी 10 मोबाईलही ताब्यात घेतले आहेत.
अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीलक्ष्मी बोरकर आणि पालघर एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सदर कारवाई केली आहे. तसेच या कारवाईत कुठलेही ठोस कागदपत्र न बाळगता भारतात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास बोईसर पोलीस करीत आहेत.