Ads
बातम्या

आजपासून विवो V11 Pro ची विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स

vivo v11
डेस्क desk team

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Vivo आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत असते. नुकताच Vivo कंपनीने Vivo V11 हा स्मार्टफोन लाँच केला होता. तर आज पासून भारतात या स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि व्हिवोच्या अधिकृत इ-स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

फीचर्स

  • 6.44 इंची FullHD+ Super AMOLED डिस्प्ले
  • क्वालकॉमचा Snapdragon 675 प्रोसेसर
  •  Android 9 Pie आधारित FunTouchOS 9.2 चा या फोनमध्ये समावेश
  • मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप, 48+8+2+2 मेगापिक्सल कॅमेरे
  • सेल्फीसाठी 32 मेगापिक्सल कॅमेरा सुपर नाइट सेल्फी सह
  • 4,500mAh क्षमतेची बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग

ऑफर्स

  • लाँच ऑफर अंतर्गत हा फोन एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास 5% डिस्काउंट
  • जिओकडून या फोनच्या खरेदीवर 12 हजार रुपयांपर्यंत इंटरनेट डेटा बेनिफिटची ऑफर
  • स्मार्टफोनसोबत एक हजार 999 रुपयांचे Vivo XE710 इअरफोन मोफत

सदर Vivo V11 ची किंमत 22 हजार 990 रूपये इतकी असून केवळ एकच व्हेरिअंटमध्ये म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मध्येच हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: