सोशल मिडिय़ा हे इतक प्रभावी माध्यम आहे, जे सर्वसामान्यालाही एका रात्रीत प्रसिध्दी मिऴवुन देते. ह्ल्ली टिक-टॉक या अँपवर आपण दररोज वेगवेगळ व्हिडिओ बघत असतो. मात्र सध्या सोशल मिडियावर इंग्रजीमध्ये गाण म्हणत असलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ टिकटॉक व्हिडिओ नसुन एक शेतकरी त्याच्या शेतात काम करत असताना जस्टिन बीबरच गाण म्हणतानाचा व्हिडिओ आहे. हे त्याला कस काय जमल, वाचा सविस्तर.
जस्टिन बीबरच गातोय गाण
इंडियन्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार जस्टीन बीबरच गाण गाणारा हा शेतकरी 26 वर्षीय असून त्याचे नाव प्रदिप आहे. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियुर गावाचा तो रहीवासी आहे. हॉलिवुडची गाणी गाण्यासाठी प्रदीप गावात फेमस असून, लुंगी, शर्ट आणि डोक्याला फडक अशा अस्वस्थेत तो हे गाण गातोय. सर्वसामान्य अशा शेतकरी वेशातील त्याच बेबी हे जस्टीन बीबरच गाण अगदी त्याच्याच स्टाईल मध्ये तो बोलत असताना व्हिडिओमध्ये दिसतेय. मुख्य म्हणजे तो शेतकरी असून हे इंग्रजी गाण गायल्याने प्रदीप चांगलाच फेमस झाला असून व्हिडीओही सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झालाय.
याही भाषांमधील गाणी गातो
26 वर्षीय प्रदीप हा पेशाने पुर्णपणे शेतकरी असून, तो शालेय शिक्षण घेताना इंग्रजी विषयात नापास आहे. जपानी आणि चीनी भाषेतील गाणी ही तो गातो. अनुकरण हे त्याच्या गाणे गाण्याचे रहस्य आहे. एकदा एकलेले गाण तो वारंवार एकतो, त्यानंतर तो गायकाच्या स्टाईलचे अनुकरण करत तो गाणी गातो आणि लोकांच मनोरंजन करतो.