राणी मुखर्जीची प्रमुख भुमिका असलेला आणि विशाल जेठवा खलनायक असलेला मर्दानी- 2 हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. मर्दानी चित्रपटातील राणी मुखर्जीची खाकी वर्दीतील भूमिकेच मोठ्या प्रमाणात कौतुक झाल. त्यानंतर मर्दानी-2 चित्रपट प्रदर्शित होण्याची तीचे चाहते वाट बघत होते. महिलांवर वाढणारे अत्याचार आणि सध्याची परिस्थितीस या सगळ्यावर एक मर्दानी पोलिस ऑफिसर शिवानी शिवाजी रॉय म्हणजेच राणी मुखर्जी कशाप्रकारे डिल करते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मर्दानी-2 चित्रपटातील राणी मुखर्जीची भूमिका पार्ट वन पेक्षा चमकदार झाली आहे.
काय आहे कथानक
या चित्रपटाची सुरवात राजस्थान मधील कोटा शहरात दसऱ्याच्य़ा यात्रा प्रसंगाने होते. मुंबई वरुन नुकतीच कोट्या मध्ये पोलीस प्रमुख म्हणून शिवानी शिवाजी रॉय म्हणजेच (राणी मुखर्जी) ची बदली होते. ती आल्यानंतर लगेचच शहरात बलात्कार होऊन हत्या होते. या घटनेच्या तपासाची सुत्र राणी मुखर्जी हातात घेते. मात्र दुसऱ्या शहरातुन येऊन अधिकारी पद मिळवल्यामुळे शिवानीला असलेला विरोध आणि अत्याचारांना रोखण्याच तिला असलेल आव्हान या सगळ्य़ातून चित्रपटाच्या खऱ्या कथानकाला सुरवात होते.
राणी मुखर्जीचा अभिनय
दरम्यान, राणी मुखर्जी पुन्हा एकदा मर्दानी मध्ये छा गयी है असेच म्हणावे लागेल. पहिल्या घटनेची भीषणता दर्शवण्यासाठी काही अंगावर येणारे प्रसंग, महिलांवरील अत्याचाराच्या तपासाच्या निमित्ताने पुरुषांची महिलांकडे पाहण्याची दृष्टी, पुरुषी अहंकार आदी गोष्टींवर थेट भाष्य केले जाते. विशाल जेठवान ने साकारलेली खलनायकाची भूमिका देखील अक्षरशाहा लोकांना चिड आणते त्यामुळे हा खलनायकही लक्षात राहणारा आहे. बलात्कारानंतर पाशवी हत्येची मानसिकता तो पडद्यावर जोरकसपणे मांडतो. सहकलाकारांची कामेही प्रसंगानुरूप सुंदर झाले असून चित्रपटाची व्यवसायिक दृष्टीकोनातून चांगल्या प्रकारे मोट बांधण्यात दिग्दर्शक गोपी पुथरान बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.