भारतात सध्या नेटफ्लिक्सची लोकप्रियता वाढच जात चालली आहे.त्यामुळे त्याच्या यूझर्सच्या संख्येतहि वाढ होत आहे. या यूझर्ससाठी हि महत्वपूर्ण बातमी असणार आहे. नेटफ्लिक्स यूझर्ससाठी तीन नवीन प्लान घेऊन आलाय.याचा फायदा यूझर्स होणार आहे.
देशात नेटफ्लिक्सवर वेब सिरिज पाहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे त्यामुळे वाढती लोकप्रियता लक्षात घेत कंपनीने लवकरच स्वस्तातील लाँग टर्म प्लान्स लाँच करणार आहे. यामुळे युजर्सचे 20 ते 50 टक्केपर्यंत पैसे बचत होणार आहे.
नवे प्लान्स
नेटफ्लिक्सच्या लाँग टर्म प्लानची वैधता तीन महिने, सहा महिने आणि 12 महिने अशी असणार आहे. यात 3 महिन्याचा प्लान 1,919 रूपये, 6 महिन्याता प्लान 3,359 रूपये तर 12 महिन्याचा प्लान 4 हजार 799 रूपये असण्याची शक्यता आहे. हे प्लान सध्या नेटफ्लिक्सच्या चालू सब्सक्रिप्शनपेक्षा 50 टक्के कमी आहे. मात्र, या प्लानची सध्या टेस्टिंग चालू असल्याने अधिकृत रित्या अद्याप करण्यात आलेले नाही. हे प्लान युजर्सच्या पसंतीस उतरतात की नाही हे पाहूनच बाजाराच लाँच केले जाणार आहेत.