भारतीय संघाचा उपकर्णधार, सलामीवीर आणि सर्वत्र हिट मॅन म्हणून लोकप्रिय फलंदाज रोहित शर्माने भारत-वेस्ट इंडिज टी-20 च्या अखेरच्या सामन्यात नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 400 षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या नवे होता. तसेच हा विक्रम करणारा तो जगातला तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे.
या षटकारावर विक्रमाची नोंद
रोहित शर्माने आतापर्यंत 52 कसोटी, 218 एकदिवसीय आणि 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 11 डिसेंबरला 104 व्या टी-20 सामन्यात रोहितने शेल्डन कॉटरलच्या चेंडुवर षटकारमारत त्यानी हा विक्रम आपल्या नावे केला आहे.
Rohit Completed 400 6s In Intl Cricket
0 to 100 6s – 166 inngs
101 to 200 6s – 76 inngs
201 to 300 6s – 59 inngs
301 to 400 6s – 59 Inngs*#INDvWI— CricBeat (@Cric_beat) December 11, 2019
सर्वाधिक षटकार लगावणार
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात षटकार मारण्याच्या यादीत दाखवायचे झाले तर सर्वोच्च स्थानी वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल असून त्याने 462 आंतरराष्ट्रीय सामन्यात 534 षटकार लगावले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी यांनी 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहे. तर रोहितच्या कालच्या खेळीमुळे 400 षटकार मारत तिसऱ्या स्थानानवर आहे. तर चौथ्या स्थानावर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकुलम आहे.
भारताचा विचार केल्यास रोहित शर्मानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचेही नाव असून त्यांनी 538 सामने खेळून 359 षटकार लगावले आहेत, तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 664 सामन्यात 264 षटकार लगवत तिसऱ्या स्थानावर आहे.