हैद्राबाद येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर देशात बलात्काराविरोधी रान पेटल. संपुर्ण देशभरात दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरु लागली. आणि दुसऱ्याच दिवशी आरोपींचे पोलीसांनी एन्काऊंटर केल्याची बातमी आली. यावर नागरिकांनी सोशल मिडियावर स्टेटस, पोस्ट टाकून पोलिसांच्या निर्णयाच स्वागत केल. त्यांनतर लोकांची असंतोषाची भावना शमली. मात्र तरीही देशभरात दर तासांच्या फरकाने बलात्काराच्या घटना घडत आहेत. या सगळ्याला आळा घालण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या “जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट” चे मिलिंद पोंक्षे यांच्याशी बातमीदारने केलेली खास बातचीत.
जाणीवच्या प्रवासात आलेले अनुभव
गेल्या चार वर्षांपासून ते मुलींना विविध ठिकाणी जाऊन व्याख्यानाच्या माध्यमातून, स्वरक्षणाचे धडे देत आहेत. मुलींवर शाळेत, कामाच्या ठिकाणी, प्रवासात, राहात असलेल्या परिसरात होणाऱ्या अत्याचाराची प्रकरण एखाद वेळेस बाहेर येतात. मात्र घरातच नातेवाईक, बऱ्याचदा सख्खा भाऊ, काका इतकच काय तर वडिलांकडून ही मुलीवर अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यावेळी या सगळ्याला सामोरे जाताना बलात्कार पीडितेचे मानसिक खच्चीकरण झालेले असते, त्यांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे असते. तसेच नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी लढा दिला पाहिजे, जोपर्यंत त्याने केलेल्या कृत्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागत नाही तो पर्यंत या नराधमांच्या कृत्यांना आळा बसणार नाही असे त्यांनी सांगितले.
स्वरक्षणासाठी काय
साधारण बाल वयात जर लैंगिक अत्याचार होत असतील तर ते लपवुन न ठेवता, न घाबरता मुलांनी पालकांना सांगावेत. मुल हे तेंव्हाच करतील जेंव्हा पालक त्यांच्याशी सुसंवाद साधतील. पाळणा घरात आपल्या मुलीला सहज ठेऊन जाणारी आई, एखाद दिवशी आपली पर्स दुसऱ्याच्या घरी ठेवेल का ? नाही ना.
दरम्यान एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला तर त्या विषयावरून मुलींच्याच बदनामीचा प्रयत्न होतो. त्यामुळे बदनामी मुळे अनेक घटना समोर येत नाहीत.बलात्काराची घटना समोर आल्यास पीडीतेला न्याय मिळवुन देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आरोपीला शिक्षा करण्याची गती वाढली पाहिजे असे मत मिलिंद पोंक्षे यांनी मांडले.