गुन्हेगारी टोळ्यांचा म्होरक्या कुख्यात अरुण गवळी याला मुंबई उच्च न्यायालयाने ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यामूर्ती पी बी धर्माधिकारी आणि न्यायमूरती स्वप्ना जोही यांच्या खंडपीठाने हा निर्णय सोमावारी 9 डिसेंबर 2019 दिला. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्ये प्रकरणी दाखल झालेला खटल्यावर मोक्का न्यायालयात सुनावणई झाली. दरम्यान, गवळी याच्यासोबत इतरही त्याच्या 11 साथिदारांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात आहे.
काय आहे कमलाकर जामसंडेकर प्रकरण?
कमलाकर जामसांडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वे याने अरुण गवळीच्या टोळीमधील दोन व्यक्तींना जामसांडेकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यांनी सदाशिव सुर्वेची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने या हत्येसाठी 30 लाखांची सुपारी मागितली होती. सदाशिव सुर्वेने होकार दिल्यावर गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितले होते. यानंतर शूटरच्या मदतीने 2 मार्च 2007रोजी कलमाकर जामसंडेकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळीबार करत हत्या करण्यात आली.