रविवार म्हंटले की सुट्टी आणि त्यादिवशीचा सकाळचा असो वा संध्याकाळचा नाष्टा हा खास असतो. मात्र, काही तरी झटपट पण स्वादिष्ट खाण्याकडे सगळ्यांचे लक्ष असते. आपण सगळ्यानाच ‘2 मिनिटात झटपट मॅगी’ माहितच असेल. पटकन काय करायचे तर ते म्हणजे ‘मॅगी’. पण कधी कधी मॅगी खाणे हे कंटाळवाणे वाटते. त्यामुळे आज आम्ही सगळ्याची पसंती असणाऱ्या ‘मॅगीची चटपटीत भजी’ कशी बनवायची हे सांगणार आहोत. तर पाहुयात खास रेसिपी…
साहित्य
एक पॅकेट मॅगी, एक पॅकेट मॅगी मसाला, एक बारीक चिरलेला कंदा, अर्धा चमच्या कॉर्न फ्लॉवर, अर्धा चमचा चण्याचे पिठ, चवीपुर्ते मीठ, तळण्यासाठी तेल
कृती
- सर्वप्रथम अर्धा चमचा तेल गरम करावा आणि त्या तेलात चिरलेला कांदा चांगला परतवून घ्यावा. व एका भांड्यात थंड करण्यास ठेवा.
- त्यानंतर कच्ची मॅगी जरा कुस्करून घ्यावी व एका पातेल्यात कमी पाण्यात नेहमीप्रमाणे ती शिजवून घ्यावी.
- शिवजलेल्या मॅगीत मॅगी मसाला व परतवलेला कांदा टाकावा. व मॅगी पूर्ण कोरडी होईपर्यंत परतवा. व ती थंड होण्यासाठी ठेवा.
- तर दुसरीकडे एका पातेल्यात चण्याचे पिठ, कॉर्न फ्लॉवर व मीठ टाकून एकत्र करून भजीचे पीठ तयार करून घ्या. व त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर घाला.
- त्यानंतर थंड मॅगीचे गोलगोल बॉल करून घ्या व तयार पीठात घोळून मंद आचेवर ठेवलेल्या तेलात तळून घ्या.
- पाच मिनिटात चमचमीत मॅगी भजी खाण्यास तयार होईल. ती सॉस किंवा हिरव्या चटमणी सोबत सर्व्ह करता येईल.