कार्तिक आर्यन, अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर या त्रिकुटाचा ‘पती,पत्नी और वो’ हा चित्रपट प्रदर्शिद झाला आहे. हा चित्रपट सन 1978 मध्ये संजीव कुमार, विद्या सिंहा आणि रंजीता यांच्यावर चित्रित केलेल्या चित्रपटाचा रिमेक आहे. पण हा चित्रपट रिमेक असला तरी दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी नव्या पद्धतीत मांडला आहे. जबरदस्त स्टार कास्ट आणि त्यांच्या अभिनयामुळे चांगले यश या चित्रपटाला लाभले आहे.
चित्रपटाची कथा
‘पति, पत्नी और वो’ या चित्रपटाची कथा चिंटू म्हणजे अभिनय त्यागी (कार्तिक आर्यन) याच्या भोवती फिरणारी आहे. चिंटू आज्ञाधारी मुलगा आणि सरकारी नोकरदार असतो. त्याचे लग्न वेदिका (भूमी पेडणेकर) सोबत होते. लग्न झाल्यानंतर आयुष्य उत्तम मार्गी लागते. मात्र नेहमीच्या रुटींगचा त्याला काही दिवसातच कंटाळा येतो. त्यानंतर चिंटू त्यागीच्या आयुष्यात एंट्री होते ती तपस्याची (अनन्या पांडे). चिंटू त्याच्या बेरंग झालेल्या आयुष्यात पुन्हा एकदा रंग भरण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याचसोबत ‘पति, पत्नी’च्या आयुष्यात ‘वो’ची एंट्री होते. दिग्दर्शकांनी या चित्रपटाची कथा साध्या पद्धतीत मांडली असली तरी सध्या चालत असलेल्या घटनांना प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यामुळे पुढे नेमक काय होत हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
कलाकारांच्या अभिनया बद्दल
चित्रपटातील सर्व कलाकारांनी आपली भूमिका चांगली पडद्यावर उतरवली आहे. कार्तिकनेही चिंटू त्यागीची भूमिका योग्य रित्या निभावली आहे. तसेच त्यासोबत अपारशक्ती खुराना याचे कामही उल्लेखनीय आहे. त्यांनी चित्रपटात चिंटूचा मित्र फहिम रिझवी याची भूमिका साकारली आहे. तसेच अनन्याचा हा दुसरा चित्रपट असला तरी अनन्यांची तपस्या ही भूमिका चित्रपटात एक वेगळीच मज्जा आणून देणारी आहे. दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचे यश पटकथा, संवाद हलकीफुलकी मांडणी पात्र निवडितही आहे. कानपूरची रंगसंगती, थोडा निवांतपणा आणि दिल्लीचा वेग दाखवण्यातही यश आले आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहणे खास ठरणार आहे.