Ads
स्पोर्टस

भारतीय महिला कबड्डी संघ अंतिम फेरीत

kabbadi
डेस्क desk team

नेपाळ येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिलांनी यजमान नेपाळला ४३-१९ अशी धुळ चारत साखळीत अपराजित रहात अग्रक्रम पटकाविला. पुष्पां कुमारी, निशा, साक्षी, दीपिका यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला. आता ९ डिसेंबर रोजी याच दोन संघात अंतिम लढत होईल.

भारताने सुरुवाती पासूनच चढाई-पकडीचा आक्रमक खेळ करीत पहिल्या डावात २१-०९ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला होता. दुसऱ्या डावात देखील तिचं आक्रमकता कायम ठेवत २४ गुणांच्या फरकाने मोठा विजय मिळविला. अंतिम सामन्याची ही रंगीत तालीम होती. पुष्पां कुमारी, निशा, साक्षी, दीपिका यांनी या विजयात उत्कृष्ट खेळ केला. महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगला देशने श्रीलंकेचा कडवा प्रतिकार १७-१६ असा मोडून काढत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. श्रीलंकेला यास्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही. त्यांची गुणांची पाटी कोरीच राहिली.

पुरुषांच्या सामन्यात श्रीलंकेने यजमान नेपाळचे आव्हान ३४-२२ असे परतवून लावत या स्पर्धेत सलग दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला नमवित भारता पुढे आव्हान निर्माण केले आहे. आजच्या शेवटच्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ४९-२२ अशी धूळ चारत सलग दुसऱ्या साखळी विजयाची नोंद केली. सुरुवातीला १४-०८अशी भारताकडे आघाडी होती. शेवटची ५ मिनिटे पुकारली तेव्हा ३५-२२ अशी आघाडी भारताकडे होती. या शेवटच्या ५मिनिटाच्या खेळात भारताने धुव्वादार खेळ करीत १४ गुणांची कमाई केली. या उलट पाक संघाने आपले अवसान गाळल्यामुळे त्यांना एकही गुण मिळविता आला नाही. या स्पर्धेत आता भारत आणि श्रीलंका हे दोन संघ २-२ साखळी विजय मिळवीत अग्रक्रमांकावर आहेत.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: