भारत-वेस्ट इंडिज सोबत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाबाद अर्धशतकी खेळी केली. विराटच्या 94 धावांने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विराटने सर्वप्रथम लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्या सोबत चांगली भागीदारी केली व विजयावर शिक्कामोर्तब केला.
मात्र, या सामन्यादरम्यान विराट आणि वेस्ट इंडिज संघातील जलद गोलंदाज केजरिक विल्यम्स या दोघांमध्ये वेगळीची खेळी पाहायला मिळाली. विराटने या गोलंदाजावर चांगली खेळी चढवत त्याच्याच ट्रेडमार्क स्टाईलने सेलिब्रेशन केल्याचे कालच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाले.
Virat Kohli brings out the "notebook" after hitting Kesrick Williams for a four and a six! What A Moment. #INDvsWI #ViratKohli 🔥 pic.twitter.com/uLFqHNmPnX
— Harish S Itagi (@HarishSItagi) December 6, 2019
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज खेळाडू आपल्या वेगळ्या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. केजरिक विल्यम्स गोलांदाजी करताना विकेट घेतल्यावर आपल्या डायरित नाव लिहून ठावण्याचा अभिनय करतो. मात्र, काल विराटने त्याच्या गोलंदाजीवर चौकार, ष्टकार लावल्यावर त्याच्याच डयरितील पान फाडत सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले.