Ads
बातम्या

पश्चिम रेल्वे, ट्रॉन्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Mega Block
डेस्क desk team

रेल्वे प्रशासनाकडून रविवारी रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घोषित केला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नसल्यास येथील प्रवाशांना दिसाला मिळाला आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते माहीम या स्थानावर अप, डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

परिणाम

  • ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
  • काही गाड्या रद्द करण्यात येतील. वांद्रे लोकल आणि खार रोड दरम्यानचे गेट बंद राहतील.

ट्रान्स हार्बर मार्ग

दरम्यान ठाणे ते वाशी आणि पनवेल या स्थानकावर ब्लॉक असणार आहे. ठाणे ते वाशी आणि नेरुळ अप, डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत ब्लॉक, सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी, बेलापूर, पनवेल डाऊन मार्गावर, तर सकाळी 10.45 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर आणि वाशी ते ठाणे अप मार्गावर ब्लॉक असणार आहे.

परिणाम

  • ब्लॉक दरम्यान ठाणे ते वाशी, बेलापूर, नेरुळ, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणाऱ्यात.
  • या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: