भारत-वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून हा सामना सुरु होत असून लोकेश राहुल आणि ऋषभ पंत भारतीय संघातील स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक असणार आहे.
सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याने राहुलला रोहित शर्माच्या साथीने उत्तम सलामी देण्याची संधी असेल. राहुलने ३१ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४२.७४च्या सरासरीने एकूण ९७४ धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्येही त्याच्या खात्यावर पुरेशा धावा आहेत.
महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत पंतला यष्टीरक्षक-फलंदाजाचे स्थान बळकट करण्याची योग्य संधी देण्यात आली. परंतु फलंदाजीतील असातत्य आणि ढिसाळ यष्टीरक्षणामुळे त्याच्या कामगिरीवर नेहमीच टीका होत राहिली आहे.
संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऑलीन, ब्रँडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एव्हिन लेविस, शेर्फानी रुदरफोर्ड, शिम्रॉन हेटमायर, ख्ॉरी पीएरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनिअर, कीमो पॉल, केसरिक विल्यम्स.
* सामन्याची वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्स १