Ads
बातम्या

भिवंडी महापालिका महापौर निवडणूक: काँग्रेसला धक्का, कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील महापौरपदी विराजमान

डेस्क desk team

भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या आज पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत कोणार्क आघाडीच्या प्रतिभा विकास पाटील यांनी बाजी मारली आहे. कोणार्क विकास आघाडीचे 04 नगरसवेक, रिपाई ऐक्य – 04, समाजवादी 02 आणि 01 अपक्ष अशा 11 नगरसेवकांची मोट बांधून कोणार्क विकास आघाडी यंदा मैदानात उतरली होती. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 46 नगरसेवकांची आवश्यकता होती

कोणार्क आघाडीचे विलास पाटील यांच्या राजकीय खेळीमुळे काँग्रेसमध्ये फूट पडून कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांचा 49 मते मिळवून विजय झाला.काँगेसच्या उमेदवार रिशिका राका यांना 41 मते मिळाली. काँग्रेसची एक हाती सत्ता असून देखील पक्षाला आठ मतांनी पराभव पत्करावा लागला. काँग्रेसची जवळपास 18 मते फुटल्याने त्यांना हा फटका बसला आहे.

काँग्रेसकडे 47 नगरसेवक होते. मात्र, काँग्रेसचे 18 आणि विरोधीपक्षाच्या गटातील भाजपचे 20 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीत दाखल झाल्याने सत्ताधाऱ्यांचा गोटात खळबळ उडाली होती. यातच भाजपचे 20 नगरसेवक असूनही पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल न करता केवळ काँग्रेसचा पराभव करण्यासाठी कोणार्क आघाडीला साथ दिली.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक मुंबई उपनगर जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता पार पडली. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, पक्षाच्या स्थानिक पातळीवर काँग्रेस नगरसवेकांमध्ये साटंलोटं न झाल्याने अनपेक्षित निकाल लागल्याचे चित्र आहे.दरम्यान, उपमहापौरपदासाठी काँग्रेसेचे इम्रानवली मोहमंद यांना ही 49 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या बाळाराम चौधरी यांचा 08 मतांनी पराभव केला. यामुळे काँग्रेस व शिवसेनेची सत्ता महापालिकेतून गेल्याने दोन्ही पक्षांना मोठा धक्का मानला जात आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: